कारमधील 6 एअरबॅग्जबाबत मोठी घोषणा!
Nitin Gadkari On 6 Airbags : गेल्या वर्षी, केंद्र सरकारने ऑक्टोबर 2023 पासून प्रवासी वाहनांमध्ये 6 एअरबॅग ()अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हे संरक्षणात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, आता सरकारने (government of india ) यातून हात काढून घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले की, सरकार प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करणार नाही. वास्तविक, वाहन उत्पादक कंपन्या कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या बाजूने नव्हत्या. ते म्हणाले की, 6 एअरबॅग अनिवार्य केल्याने विशेषत: छोट्या कारच्या किमती वाढतील. auto news : आता नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात एअरबॅग्जबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना, 'आम्हाला कारसाठी 6 एअरबॅग्ज अनिवार्य करण्याचा नियम करायचा नाही.' अपघात झाल्यास वाहनाच्या भक्कम भागांशी थेट टक्कर होण्यापासून प्रवाशांचे संरक्षण करण्यात एअरबॅग्ज महत्त्वाची भूमिका बजावतात. अपघात झाल्यास, ते फुग्यासारखे उघडतात आणि प्रवाशाला गाडीच्या घन भागांवर आदळण्यापासून रोखतात. त्यामुळे गंभीर दुखापत टळते आणि प्रवासी सुरक्षित राहतात. जितक्या जास्त एअरबॅग असतील तितकी तुम्हाला अधिक सुरक्षितता मिळेल. कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून याआधीच दोन एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. 1 एप्रिल 2021 पासून कारच्या पुढील दोन सीटसाठी एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. सध्या, सर्व कारमध्ये किमान दोन एअरबॅग्ज (समोरच्या दोन सीटसाठी) पुरविल्या जातात. दोन एअरबॅग नसलेली कोणतीही नवीन कार भारतात लॉन्च होत नाही.
Read the full article












