नांदेड: नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असल्यामुळे डाॅ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडले असून त्यातून एक लाख क्युसेक्सच्या जवळपास पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रामध्ये सोडला जात आहे. परिणामी गोदावरी दुथडी भरून वहात असून गोवर्धन घाटची स्मशानभूमी तसेच नावघाटचा पुल पाण्याखाली गेला आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीपात्रात कोणीही जावू नये, असा धोक्याचा इशारा नावघाट, मरघाट परिसरातील नागरिकांना देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून जीवरक्षक दलाला तैनात करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. . . . . . . . #nanded #nandeddiaries #mh26 #nandedshehar #allaboutnanded #godavari #godavaririver #godavaririver🌊 #नांदेड #महाराष्ट्र #riversofindia #nandedkar #huzursahibnanded #nandedsahib #nanded_shehar (at Nanded) https://www.instagram.com/p/CTmn3xPtSc9/?utm_medium=tumblr













