पोवारीचा घाट मालवी तर थाट नागपूरी
पोवारी बोलीइ. स. १६९१ ते १७७५ या कालावधीत मालवातून (मध्यप्रदेश) विदर्भात मोठ्याप्रमाणात स्थलांतरीत झालेल्या पोवार (पंवार) समाजासोबत पोवारी बोली महाराष्ट्रात आली. त्यामुळे हिंदीची उपभाषा असलेल्या या बोलीवर हिंदी, मालवी, राजस्थानी, गुजराती, बघेली, मरारी, बुंदेली सोबतच मराठीचा प्रभाव दिसून येतो. विदर्भातील दिर्घकालीन वास्तव्यामुळे पोवारी बोलीचा मूळ तोंडवळा बदलून गेला आहे. तिचा घाट जरी मालवी असला तरी…












