'जेन स्ट्रीट ' प्रकरणात शेअर बाजारांचा उथळपणा वेशीवर !
विशेष आर्थिक लेख सिक्युरिटीज एक्सचेंजेस बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने गेल्या सप्ताहात न्यूयॉर्कस्थित जेन स्ट्रीट या भांडवली बाजारात व्यवहार करणाऱ्या कंपनीविरुद्ध मोठी कारवाई केली. जगभरातील 45 देशांच्या शेअर बाजारांवर करोडो रुपयांचा नफा कमवणाऱ्या या “पांढरपेशा गुन्हेगारी” कंपनीवर भारतात सहा महिन्यांची अंतरिम बंदी घातली आहे. यामुळे भारतीय भांडवली बाजाराचा नियामक असलेल्या सेबीचा दरारा किंवा पत…














