PM Modi पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेचा मोठा सन्मान; 'लीजन ऑफ मेरिट' पुरस्काराने गौरव PM Modi get US legion of merit award : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतील प्रतिष्ठेचा असलेल्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. अमेरिकेतील 'लीजन ऑफ मेरिट' या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. December 22, 2020 by Shrikant Bhosale वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचा समजला जाणार लीजन ऑफ मेरिट या पुरस्काराने सन्मानितक करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला. या पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: पंतप्रधान मोदी यांचे सुचवले असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधी रशिया, सौदी अरेबिया, बहरीन, संयुक्त अरब अमिरात, मालदीव आदी देशांनीदेखील सन्मानित केले आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठीत पुरस्कार लीजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठीत पुरस्कार समजला जातो. अतुलनीय आणि असामान्य कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांसह अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना प्रदान केला जातो. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत झाले. या आधारेच ट्रम्प यांनी मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. PM Modi awarded Prestigious Military Award 'Legion Of Merit' For Elevating India-US Strategic Ties !! by the US President !! Congrats PM @narendramodi Ji 💐 #LegionOfMerit Congrats PM @narendramodi Ji 💐 PM मोदी को अमेरिका से मिला बेहद खास सम्मान, ट्रंप ने किया सम्मानित💘💓😍💯बधाई हो😍💃💯 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को अमेरिका के प्रतिष्ठित लीजन ऑफ मेरिट अवॉर्ड से सम्मानित किया गया है. (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CJGVxGUL6Ka/?igshid=11stxtpixdtgw