अबोली’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकरची एन्ट्री; पहिल्यांदाच दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘अबोली’मध्ये लवकरच एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकरची दमदार एन्ट्री होणार असून, ती पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘साता जल्माच्या गाठी’ आणि ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अक्षया जवळपास चार वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहवर झळकणार आहे. यावेळी ती…

















