सगळे हल्ले मुंबईमधील पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर अथवा ट्रेनमध्ये (प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले) झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:२४ ते ६:३५ ह्या ११ मिनिटांच्या कालावधीत हे हल्ले झाले. मुंबईची धमनी समजली जाणारी पश्चिम रेल्वे दररोज अंदाजे ४५ लाख प्रवाशांची ने-आण करते. ह्या हल्ल्यांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले. अडकलेल्या प्रवाशांना ११ जुलैची रात्र त्यांचे जवळ राहणारे नातेवाइकांकडे काढावी लागली. ज्यांना हे शक्य नव्हते त्यांच्यासाठी प्रशासनाने शाळा-कॉलेजांमध्ये तात्पुरती व्यवस्था केली होती. बेस्टनेही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आपल्या सर्व बसेस रस्त्यावर आणल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख ह्यांनी मृतांच्या नातेवाइकांना १ लाख व जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. भारतीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव ह्यांनी रेल्वेतर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये व जवळच्या नातेवाइकाला रोजगार हमीची घोषणा केली. कधीही न थांबणाऱ्या मुंबईला व मुंबईकरांना गतीला रोख लावणाऱ्या लष्कर ए तोयबाच्या दहशदवाद्यांचा हे पेज धिक्कार करते. #ShameonlashkarEToiba #MumbaiBlast #SpiritofMumbaikar #LocaltrainBlast #MumbaiLifeLine













