अनेक कुटुंबाना भेडसावणारा आणि गोंधळात टाकणारा प्रश्न! अर्थात्, हा अतिशय मोठा अन् महत्वाचा निर्णय आहे कारण आपल्या पुढील आयुष्यावर याचे दूरगामी परिणाम होतात. म्हणूनच निर्णय घेण्यापूर्वी खालील प्रमुख बाबी विचारात घया –
घर हे `अॅसेट’ नाही! – पूर्वीच्या पिढीनुसार आपल्याकडे चालत आलेला हा सर्वात मोठा गैरसमज आहे. – अॅसेट म्हणून लोक घर विकत घेतात, जी खरंतर एक लायेबिलिटी आहे. – नीट समजून घ्या – अॅसेटमुळे पैसे तुमच्या खिशात जमा होतात. – लायेबिलिटीमुळे पैसे तुमच्या खिशातून काढून घेतले जातात. – घराची किंमत फक्त `वाढतच जाते’ हा एक कल्पनाविलास आहे. खरंतर, गेली कैक वर्षे घराच्या किंमती स्थिर असून अनेक ठिकाणी तर त्यात घट झालेली दिसते. – किंमत जरी वाढली तरी तो फायदा तुमच्या खिशात जमा कधीच होत नाही, निव्वळ कागदावरच राहातो.












