धावत्या कंटेनरने करूळ घाटात घेतला पेट....वाहतूक खोळंबली
करुळ घाटात गगनबावड्यापासून चार किमी अंतरावर चालत्या कंटेनरने पेट घेतला.हा प्रकार आज ता२८सकाळी साडे सात च्या सुमारास घडला.यात कंटेनरची कॅबिन पुर्णत जळाली.रस्त्याच्या मधोमध हा कंटेनर असल्यामुळे तळेरे-कोल्हापुर महामार्गावरील वाहतुक दोन तास ठप्प झाली.या आगीत कंटेनरचे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. कोल्हापुर येथील गणेश खिलारी यांच्या मालकीच्या कंटेनरने चालक युसूब उमर शेख (वय-२६)हे चालक डोजर मशीन आणण्यासाठी २७मे ला बांदा येथे गेला होता.बांदा येथे डोजर मशीन कंटेनरमध्ये भरून तो तळेरे-वैभववाडी मार्गे कोल्हापुरच्या दिशेने निघाला होता.आज ता.२८रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो करूळ घाटात पोहोचला.गगनबावड्यापासुन चार किलोमीटर अतंर शिल्लक असताना कंटेनरमधुन धुर येत असल्याचे युसूबच्या लक्षात आले.त्यामुळे त्याने गाडीतुन उतरून पाहीले असता कॅबिननजीक आग लागल्याचे दिसुन आले.त्याने त्याच्याजवळ असलेल्या पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.परंतु आग आटोक्यात आली नाही.त्यामुळे त्याने ११२ वर कॉल करून मदत मागीतली.पेटता कंटेनर घाटरस्त्याच्या मधोमध असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली.या घाटमार्गे सध्या मोठी वाहतुक असल्याने तासाभरात रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांची रांग लागली. Read the full article









