खरीप 2020 विमा प्रक्रिया सुरू बहुतांश राज्यात खरीप 2020 साठी पीक विमा(crop insurance)करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सरकारकडून ट्विटरवर याबाबत सूचना देण्यात आली आहे.विमा योजना ऐच्छिक असून पिकांना नैसर्गिक संकटापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली होती. ही योजना 13 जानेवारी 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. भारतीय कृषी विमा कंपनी AIC या योजनेला राबवत आहे.









