आवळा प्रक्रिया व्यवसाय कसा सुरु करायचा ?
राहुरी – आवळा प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाने आवळा फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. १७ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राहुरी येथे हे प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणासाठी १० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी केल्यास ४००० रुपये प्रशिक्षण शुल्क असून त्यानंतर येणाऱ्यांना ५००० रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.…
















