आजच्या काळात मदत ही संकल्पना म्हणजे माझा काय फायदा ? तो होणार असेल तर देईन अशी प्रवृत्ती असताना केवळ एका व्हाट्सअप्प समूहाच्या उपक्रमावर आणि त्या समूहातील व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवून आपली मदत योग्य त्या गरजू लोकांपर्यंत निश्चितच मिळेल ह्या खात्रीने इतकी मोठी रक्कम देऊन उपक्रमाला पाठबळ देणं ही खरंच कौतुकाच्या पलीकडची गोष्ट आहे... आणि अश्यावेळी आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे, आणि आपण सर्व मिळून ती जबाबदारी नक्की निभावू हा विश्वास आहे. *एक हात आपुलकीचा, विश्वासाचा आपल्या माणसांना सावरण्याचा* मराठी नाटक समूहाच्या ह्या प्रामाणिक उद्देशावर आणि केलेल्या मदतनिधीचा थेट विनियोग संबंधित गरजू रंगकर्मीनाच मिळेल ह्या विश्वासाने *मराठी नाट्य, चित्रपट कलावंत सौ. अश्विनी भावे* ह्यांनी मराठी नाटक समूहाच्या उपक्रमाला रुपये 5 लक्ष आर्थिक पाठबळ दिलेले आहे, आणि ह्यापुढे देखील पुढचे 3 महिने अश्याच पद्धतीने मदत करण्याचे ठरवले आहे . म्हणजेच एकूण रुपये 20 लक्ष मदत करण्याचे मान्य केले आहे. समस्त मराठी नाटक समूह आणि पडद्यामागील 200 कलाकार सौ. अश्विनी भावे ह्यांचे ऋणी आहेत. 🌹🌹 - मराठी नाटक समूह #AshviniBhave #AshwiniBhave #MarathiNatakSamooh #MarathiActors #MarathiActress #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/CAxtKScJeg9/?igshid=t2dxw296j5qv

















