श्रावणात फुलतो साडवलीच्या माळावर दीपकाडीचा शुभ्र सडा !
संगमेश्वर देवरुख मार्गावर साडवली येथे माळरानावर सध्या सर्वत्र दीपकाडीच्या पांढऱ्या फुलांची दुलई पसरल्याचे मनमोहक दृश्य पहायला मिळत आहे. दीपकाडीचा समावेश संकटग्रस्त प्रजातीमध्ये करण्यात आला आहे. दीपकाडीला, गुलछडी असेही म्हटले जाते. जे. डी. पराडकर पवित्र श्रावण महिन्यात निसर्ग देखील आसुसलेला असतो. माळरानावर फुलणारी विविध रंगी फुले वाऱ्याच्या मंद झुळकांवर डोलू लागली, की श्रावण महिना सुरू झाल्याची…













