शिलालेखात भाषेची विविध रूपे: डॉ. नीलेश शेळके
कोल्हापूर: शिलालेख हा भाषेच्या प्रवासाचे दाखले देणारे ऐतिहासिक आणि विश्वासार्ह वारसदार असून या शिलालेखांमध्ये भाषेची विविध रूपे सापडतात, असे प्रतिपादन शिलालेख अभ्यासक डॉ. नीलेश शेळके यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त आयोजित ‘शिलालेखातील मराठी’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे होते. मराठी…














