आदमपूर मधील बत्तीस कुटुंबांची धुरापासून मुक्तता .....गॅस कनेक्शनचे वितरण. संस्कृति संवर्धन मंडळाची मदत. पर्यावरणाचे रक्षण, धुरापासून महिलांची मुक्तता, प्रदूषण मुक्त स्वयंपाकासह धुरामुळे होणाऱ्या विविध आजारांपासून कायमची मुक्तता, निरोगी कुटुंब, स्वच्छ व सुंदर आदमपूर करिता सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळाच्या सहकार्याने रविवार (ता.२५) रोजी आदमपूर येथील ३२ कुटुंबांना एलपीजी गॅसचे कनेक्शन वितरीत केले आहे. एका कनेक्शनसाठी अंदाजित चारहजार पाचशे रुपये खर्च आहे. लाभार्थ्यांना हि मदत बिनव्याजी केली जात असून, खर्चाची परतफेड हे लाभार्थी बारा महिन्याच्या कालावधीत करणार आहेत. आजपर्यंत संस्थेने सगरोळी, हिप्परगा, अटकळी, आदमपूर येथील जवळपास दोनशे कुटुंबांना हि मदत केली आहे. संस्थेचे विश्वस्त आनंदिदास महाजन, प्रकल्प संचालक अभिषेक देशमुख, सौ. शीला महाजन यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्यात आले. #RuralIndia #KeyInitiatives #Green #Gogreen #greenindia #Environment#SustainableWorld #climate Abhishek Deshmukh Abhijeet Mahajan Nagesh Pawar Lalu KangulwarVasant Rawangaonkar Santosh Kotnod Pravin Yannawar Madhav Tate






