मोहनदर किल्ल्याची निर्मिती केली गेली ती मुळात सातमाळ डोंगरांगेतील धोडप, रवळ्या जवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी गड ( धार्मिक ठिकाण ) अहिवंत किल्ला यांच्या वर टेहळणी साठी पण मोहनदराच एवढंच वैशिष्ट नाही तर मोहनदरावर एक विशाल काय नेढं देखील आहे. नेढ्यात चढण्याचा थरार, तिथला घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला पाहाण्यासाठी एकदा मोहनदर किल्ल्याला भेट द्यायला हरकत नाही.या नेढ्याविषयी अनेक आख्यायिका देखील आहे महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडलेला. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला. त्याच्या मागोमाग जाणार्या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ तयार झाल. अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल.नाशिकपासून फक्त ५६ किमी असलेल्या या नेसर्गिक आश्चर्याला व किल्ल्याला नक्कीच भेट द्या. . #mohandar #maharashtra_forts #maharashtra_desha #maharashtra_ig #sahyadri_ig #nashik_exploring #nashik_pixel #nashik_ig #gadkille #durgnaad #ranwara #jayostute_maharashtra #huntforspot (at Nashik नाशिक Maharashtra) https://www.instagram.com/p/CdFVMQKOTOO/?igshid=NGJjMDIxMWI=