शरभ शिल्प इतिहास... गड , मंदिरे , विहिरी , वाडे इत्यादी जुन्या इमारतींच्या भिंतीवर आढळणारे व्याघ्रसदृश काल्पनिक प्राण्याचे शिल्प म्हणजे शरभ . या शरभ प्राण्याबद्दल हिंदुधर्म ग्रंथात काही कथा वाचनास मिळतात . भगवान शिवशंकराने धारण केलेले काल्पनिक पशुचे रुप म्हणजे शरभ . हिरण्यकश्यपु चे विदारण केल्यावर नरसिंह उतला मातला . त्यापासुन मुक्ती मिळवण्यासाठी लोकांनी भगवान शंकराची उपासना केली . आखेर नरसिंहाचा धारण अवतार संपविण्यासाठी शंकराने प्राणी , पक्षी व मानव यांचे एकत्रित आसे अधिक शक्तिशाली रुप धारण केले तेच हे शरभ रुप . डॉ . ग . ह . खरे आपल्या मुर्तिविज्ञान या ग्रंथात देखील ही माहिती देतात . ते सांगतात शंकराने दोन तोंडे , आठ पाय , दोन पंख , लांब शेपुट आसलेल्या शरभाचे रुप धारण केले व नरसिंह अवतार संपविला . नंतर त्याचे कातडे आंगावर पांघरुन , डोके मस्तकावर धारण केले . अशा प्रकारच्या प्राण्याची शिल्पे महाराष्ट्रात आढळत नसली तरीही महाराष्ट्रात कित्येक ऐतिहासिक ठीकाणी चार पाय , तीक्ष्ण नख्या आसणारा , लांब शेपटीचा , पंख आसलेला कींवा नसलेला अक्राळ विक्राळ प्राणी शिल्प कृतीत आढळतो म्हणजे तो शरभ असावा . सत्य परिस्थिती पहाता हत्ती किंवा सिंह यांपेक्षा शक्तिशाली , पंख आसणारा आसा कोणताही प्राणी अस्तित्वात आसल्याचे उल्लेख नाहीत . हा केवळ काल्पनिक प्राणी आहे . मात्र महाकवी कालीदासाच्या ' मेघदुत ' या महाकाव्यात शरभाचा उल्लेख आहे . हिंदु धर्म शास्रातील १०८ उपनिषदांपैकी ‘ शरभोपनिषद ' हे देखील एक उपनिषद आहे . म्हणजेच हिंदुधर्म शास्त्रात शरभ संकल्पना अस्तित्वात आहे . मात्र त्याच बरोबर कित्येक परकिय तसेच परधर्मीय ऐतिहासिक स्थळांवर शरभाकृती पहायला मिळतात . हत्ती हे अतिशय बुद्धिमान व सामर्थ्यशाली प्राणी म्हणून ओळखले जातात . याच हत्ती प्रमाणे सामर्थ्यवान व हुशार शत्रूला पराजीत करण्याची ताकद बाळगणारे राज्यकर्ते स्वतःला शरभ ( अती शक्तिशाली ) दर्शवत , स्वताचे व राज्याचा शक्तिचे प्रदर्शन करण्याचे शरभ शिल्प हे एक उत्तम साधन समजत असावे . म्हणुनच शरभ शिल्प गड , किल्ले , मंदिरे तसेच इतर पुरातन वास्तूंच्या दर्शनी भागावर लावले जात असावे . Cr @raj_patil_.01 #durg_naad #durgvede #sahyadri_ig #sahyadris #sahyadri_clickers #sahyadri #mountaintop #mountaineering #kille #maratha #mavala #mansoon #maharashtra #trek #gopro #trekking #incredibleindia #sahyadri #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #nashik #nashikcity #nashikkar #maharashtra_ig #forts #trekking (at Hatgad Fort) https://www.instagram.com/p/ChEbFV_IiEI/?igshid=NGJjMDIxMWI=