आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक मुंबई / प्रतिनिधी : मध्य रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-कर्जत दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घोषत केला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर या काळात बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला-वाशी मार्गावर ही रेल्वेचा मोगाब्लाॅक आहे. मध्य रेल्वेवर सकाळी ९.१५ ते दुपारी १.५३ दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून, कर्जत, खोपोली,बदलापूर,अंबरनाथला जाणाऱ्या सर्व गाड्या बंद राहतील. सकाळी १०.४८ ते दुपारी १.०६ वाजेपर्यंत ठाणे ते कर्जत, बदलापूरला जाणाऱ्या डाउन लोकल सेवा बंद राहतील. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.२३ वाजेपर्यंत अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या सर्व लोकल सेवा बंद राहतील. पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान बोरिवली- गोरेगाव दरम्यान जलद गाड्या बंद राहतील.















