महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेत क्रांती : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेत मोठे बदल
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक परिषदेच्या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) या दोन्ही योजनांमध्ये क्रांतिकारक सुधारणा जाहीर करण्यात आल्या. या निर्णयांमुळे केवळ उपचारांची संख्या व पॅकेजेसच वाढणार नाहीत, तर रुग्णालयांना योग्य…











