Latest news updates on nagpur startup fest | नागपूर स्टार्टअप फेस्ट - ऑक्टोबरला कवी सुरेश भट सभागृहात "नागपूर स्टार्टअप फेस्ट" होणार असल्याची घोषणा महापौर मा. नंदाताई जिचकार यांनी महापालिकेच्या प्रांगणात झालेल्या एका बैठकीत केली.
नागपुरात स्टार्टअप फेस्ट
नागपुर : नागपुर येथे नवीन कल्पनांवर आधारित व्यवसाय सुरुकरू पाहणाऱ्यांसाठी व्यवसायाधिष्टीत वातावरण तयार व्हावे म्हणून भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषद, नवयुवक इंटर्प्रिनर्स आणि नागपूर महानगर पालिका यांच्या सौजन्याने भव्य “स्टार्टअप फेस्ट” आयोजित केल्या जाणार आहे. ६ ऑक्टोबरला कवी सुरेश भट सभागृहात “नागपूर स्टार्टअप फेस्ट” होणार असल्याची घोषणा महापौर मा. नंदाताई जिचकार यांनी महापालिकेच्या प्रांगणात झालेल्या एका बैठकीत केली.
ही बातमी पण वाचा : नागपूर स्टार्टअप फेस्ट
नागपुरात पहिल्यांदाच आणि किंबहुना महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात स्टार्टअप फेस्ट येथे साजरा केला जाणार असून नागपुरात नाविन्यपूर्ण व्यवसाय तयार होण्यामध्ये याची नक्कीच मदत होईल असे म्हणून महापौर नंदा जिचकार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विश्वास व्यक्त केला. शहरात नव्या संकल्पनेसह व्यवसाय सुरु करू पाहणाऱ्या युवकांसाठी हि सुवर्णसंधी असून आपले विचार जगासमोर सादर करून आपल्या व्यवसायात भागीदार मिळण्याचे हे योग्य ठिकाण असेल असे भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषदेचे सचिव आणि कार्यक्रमाचे संयोजक केतन मोहितकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी आयोजन समिती तयार करण्यात येत असून या मध्ये व्यावसायिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सहभाग आहे. लवकरच याचे अवलोकन करून आयोजन समिती आणि संपूर्ण प्रक्रियेसह कार्यक्रमाची रूपरेषा (nagpurstartupfest.in) या वेबसाईट वर प्रकाशित केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महापालिकेत आयोजित बैठकीत महापौर नंदाताई जिचकार यांनी “नागपूर स्टार्टअप फेस्ट” च्या लोगो चे अनावरण केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी परिषदेचे सचिव केतन मोहितकर, परिषदेचे अध्यक्ष डॉ आशिष ससनकर, नवयुवक फाउंडेशन चे देवांग दवे, गौरव मिश्रा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.















