पाहा Photo : अभिनेता सुबोध भावे पत्नी मंजीरीला घराकामाला अशी करत आहे मदत
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषीत केले आहे. आणि म्हणूनच मागील आठवड्यापासून लोकं घरात बसून आहेत. मात्र घरात बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा, त्यांना मदत करण्याचा पर्याच बहुतांश लोकांनी निवडलाय.
शुटिंगमध्ये सतत व्यस्त असणारा अभिनेता सुबोध भावे या निमित्ताने घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. एवढच नाही तर पत्नी मंजीरीलाही कामात मदत करतोय. सुबोध स्वत: तर तिला कामात मदत करत आहेच पण त्याच्यासोबत त्याची मुलं मल्हार आणि कान्हाही त्याला या कामात मदत करत आहेत. सुबोधची पत्नी मंजीरीने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला. यामध्ये सुबोधसह दोन्ही मुलं घरातील झाडलोट करण्यात मदत करत असतानाचं पाहायला मिळतय. ................Read More












