पृथ्वी २.० : भाग ४
त्या नंतर रात्री पुन्हा एक यान मला घ्यायला आले. पण हे यान पूर्वी आलेल्या याना पेक्षा वेगळे आणि मोठे होते. बाकी पृथ्वीवरील इतर सहकारी ही त्या यानात होते. त्यांनी आमच्या कडून ते भ्रूण घेतले आणि त्यांच्याकडे असलेल्या एका दुसऱ्या केस मध्ये ठेवले. आता आम्ही सर्वजण त्या दुसऱ्या ग्रहावर जाणार होतो. तो ग्रह कसा असेल, तेथे वसणारी नवी मानव वस्ती कशी असेल? यासारखे प्रश्न आमच्या मनात होते. ते यान आम्हा सर्वांना घेऊन निघाले त्याच्या पुढच्या प्रवासाला पण या वेळेस यानाचा मार्ग जरा वेगळा होता. आम्ही सूर्यमालेच्या विरुध्द बाजूने जात होतो. ते यान सूर्यमालेच्या टोकाला जाऊन थांबले. तेथे एक पोर्टल उघडल. त्या यांनाच कप्तान आमच्या जवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी प्रमुखांचा संदेश आहे त्यांना तुम्हाला पुढचा प्लान सांगायचा आहे.” असे म्हणून तो गेला. आमच्या समोर त्या प्रमुखाची एक प्रतिकृती तयार झाली आणि ते आमच्याशी संवाद साधू लागले “आता तुम्ही तुमच्या ध्येयाच्या फार जवळ आहात. ही एक नवी सुरवात आहे. तुम्हाला नव्याने जीवनाची रचना करायची आहे, या पोर्टलच्या मागे असलेल्या ग्रहमालेतील एक ग्रहाची आम्ही तुमच्यासाठी नवीन ग्रह म्हणून निवड केली आहे. तेथे तुम्हाला जीवनाचे नवीन बीज रोवायचे आहेत. आमची एक टीम अगोदरच तिथे पाठवली आहे. तुमचा बेस तिथे तयार आहे. आता पुढे सर्वकाही तुम्हालाच करायचं आहे. तुम्हाला तेथे एक नवीन वस्ती वसवायची आहे. तुम्हाला एक सर्वात मोठा प्रश्न पडला असेल की आम्ही या मिशनसाठी तुमचीच निवड का केली? खरं तर तुम्ही तुमच्या तुमच्या क्षेत्रा मधले तज्ञ आहात आणि सर्वांत महत्वाचा म्हणजे तुम्ही तुमची देशात याच मिशन वर काम करत होतात. पण यश काही मिळत नव्हत म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतोय. या नव्या जगाची रचना तुम्हालाच करयची आहे. इथले सर्व नियम अटी तुम्हालाच ठरवायचे आहेत. आता सर्व काही तुमच्या हातात आहे, या नव्या ग्रहाचे भविष्य तुमच्या हातात आहे. ह्या नव्या ग्रहावरचे लोक नक्की प्रगती करतील भेटू पुन्हा, गुड लक !” असे म्हणून ती प्रतिमा गायब होते. यानाचा कप्तान म्हणतो “ चला नव्या विश्वात एक नवीन सुरवात करायला. ” आम्ही त्या पोर्टल मध्ये प्रवेश केला. ते यान आम्हाला त्या ग्रहावर घेऊन गेला. तो ग्रह जवळपास पृथ्वीच्या आकाराचा होता. तेथले वातावरण ही पृथ्वीप्रमाणेच होते. तेथे बेस अगोदरच तयार होता. ती जागा जीवनासाठी अतिशय योग्य होती. सर्वत्र हिरवेगार जंगल, शुद्ध पाणी, स्वच्छ हवा, नयनरम्य परिसर. आम्ही सार्वजण अगदी मोहून गेलो. ते यान हळूहळू बेसच्या ठिकाणी उतरलं आम्ही सर्वजण यानातून बाहेर आलो, फार वेगळ वाटत होत. ही एक सुरुवात होती नव्या युगाची एका नव्या जीवनाची. तो ग्रह आम्हाला पृथ्वीप्रमाणे विकसित करायचा होता पण पृथ्वीसारखा नाही. जी चूक आम्ही आधी केली ती चूक पुन्हा इथल्या लोकांना करू द्याची नव्हती. एक सुसज्ज असं सर्व सुख सोई युक्त सुंदर शहर आम्हाला तेथे वास्वायचा होत. आम्ही आमच्या कामाला सुरवात केली त्या सर्व भ्रूणांना लगेच इनक्यूबेशन चेंबर मध्ये ठेवल. त्याची सर्व कामाची जबाबदारी आमच्या पैकी एका व्यक्तीची होती कारण ती एक बायोलॉजीतील तज्ञ होती. आमच्या टीम मधे सर्व क्षेत्रातील तज्ञ अशी मंडळी होती. आमच्यात भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, अभियांत्रिक , एवढाच काय तर साहित्य,कला या क्षेत्रातील देखील तज्ञ मंडळी अमच्या टीम मध्ये होती. सर्व मिळून आमचा २५ जणांचा चमू होता. आमचा काम होता त्या नव्या ग्रहावर एक शहर वसवायचं. आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून एक नवनिर्मिती करायची होती. आम्हाला सर्वांना एकत्र काम करायचे होते, त्या ग्रहाला सुंदर, त्याबरोबरच प्रगत बनवायचे होते. आम्ही आसपासच्या परिसराची पाहणी केली. सर्वांच्या डोक्यात नवनवीन कल्पना येत होत्या. आम्ही त्या परग्राहयाच्या ग्रहाचा आदर्श समोर ठेऊन, त्याप्रमाणेच त्या शहराची रचना करायची असे ठरवले. आम्ही जेव्हा त्यांच्या ग्रहावर होतो तेव्हा वेळोवेळी तेथे आम्हाला पृथ्वीचाच भास होत होता. जेव्हा आम्ही त्यांच्या शहरांना भेट दिली, तेव्हा आम्ही तेथल्या त्या सौंदर्याने आणि रचनेतील सुबकता, अचूकता याने अगदी मोहून गेलो. त्यांची जी शहराची रचना होती आधीच प्लान केलेली होती. त्याला अनुसरून आम्ही एक छान प्लान तयार केला आणि कामला सुरुवात केली, तेथील साधन संपत्तीचा योग्य वापर करणे आणि भविष्यात तेथील लोकांना करायला लावणे ही आमची जबाबदारी होती. त्या पराग्रह्यांच्या मदतीने थोड्याच कालावधीत आम्ही एका सुंदर वस्तीची निर्मिती केली. आता पुढे ही सर्व जबाबदारी होती ती ह्या नव्या पिढीची. आम्ही आमचं काम केल होत. आम्ही इथले सगळे नियम तिथल्या लोकांना समजून सांगितले. तेथली सर्व कामे वाटून आणि समजून सांगितली. कारण ते लोक इथले भविष्य होते. हे सर्व त्यांनाच पुढे न्यायचे होते. आवश्यक तेवढे सर्व ज्ञान आम्ही त्यांना दिले आणि पुढील सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. आता ते लोक या नव्या ग्रहावर सुखाने नांदत आहेत आणि त्यांचा विकास करत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी पृथ्वीवरील सर्व ज्ञान त्यांच्या पुढील पिढीसाठी लिखित स्वरुपात जतन करून ठेवलाय. पृथ्वीविषयी सर्व माहिती आम्ही त्यांना त्यांना सांगितली, त्यांच्या इथल्या जन्मच रहस्य, आणि त्यांच्या आमच्या मूळ जन्म स्थान विषयी सर्व माहीती आम्ही त्यांना दिली आणि जतन करून ही ठेवली आहे. त्यांचा इतिहास पुढच्या पिढीसाठी जपून ठेवलाय. पण राहून राहून मनात एक प्रश्न राहिलाच ते कोण होते? ते पृथ्वीवर का आले होते? त्यांनी आपल्याला का मदत केली? यात त्यांचा काय फायदा? यासारखे अनेक प्रश्न आमच्या मनात होते? ज्यांची उत्तरे आम्हाला मिळाली नव्हती. इथे सगळ मार्गी लाऊन ते निघून गेले. आम्ही सार्वजण इथेच थांबलो, या सर्वांसोबत आयुष्याच्या शेवट पर्यंत आमच्याया निर्मितीसोबत त्याच गूढ प्रश्नांचा विचार करत. पृथ्वीवरील जीवनाला एक नवी दिशा मिळाली होती. ते जीवन आज इथे समृद्ध होत आहे. प्रगती करत आहे. खरंच जीवनाची व्याख्या ही आपण समजतो त्यापेक्ष्या फारच वेगळी आहे. कारण एक मार्ग बंद झाल्यावर दुसरा मार्ग अपोआप उघडतो. कधीकधी आपणच तो उघडतो. ***











