2/2 ज्ञानयोगात स्वामी विवेकानंदांनी "उत्पत्ती,स्थिती,लय" व "देश काल निमित्त(Space,Time, Matter)" या सहित प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञानाच्या संकल्पनांचा तर्कशुद्ध पद्धतीने उहापोह केला आहे ,त्यामुळे मला व्यक्तीगत Astrophysics, Atronomy, Genetics, Neurology , Quantum Theory,Big Bang या सारख्या गोष्टी अभ्यासत असताना बऱ्याच संकल्पना एकमेकांना पुरक असणाऱ्या गोष्टी जाणवल्या. माझा एक गोष्टीवर तर्कशुद्ध गोष्टी,चिंतन ,मनन, साधना यांच्या आधारावर विश्वास बसला आहे की " देश काल ,निमित्त" च्या संदर्भातील स्वामी विवेकानंद आणि प्राचीन तत्वज्ञानात असणारे विवेचन आधुनिक विज्ञानातील संशोधनात मोठी भूमिका बजावेल हा आत्मविश्वास दृढ झाला. मधल्या काळात बरेच बरे वाईट प्रसंग आयुष्यात घडले त्यातून बाहेर पडण्याचे बळ याच गोष्टीतून मिळाले ,पत्नी भौतिकशास्त्राची प्राध्यापिका असल्यामुळे तिचीही या साधनेच्या प्रवासात संकल्पना समजून घेताना मदत झाली . दोन दिवसांपूर्वी माझे मित्र डॉ उमेश काळे आणि इंजि.कृष्णा पवार यांची भेट झाली असता आध्यात्मिक चर्चा झाली आणि कृष्णा पवारांनी स्वानुभवातून साकार झालेले नुकतेच प्रकाशित "ओढ शाश्वत अनुभुतीची " पुस्तक भेट म्हणून दिले आणि अभिप्राय देण्यास सांगितले ,सदर पुस्तकाची वाचनवारी करत असताना लेखकाच्या आध्यात्मिक व वैज्ञानिक बैठकीची कल्पना येते . परत एकदा शांततेत वाचन करून अभिप्राय देण्याचे ठरवले कारण आध्यात्मिक पुस्तकाला घाई घाईत अभिप्राय देने सहेतुक होणार नाही ,माझ्या आतापर्यंतच्या वाचन ,साधना यामुळे सदर पुस्तक वाचताना काही गोष्टी स्पष्टपणे जाणवल्या त्या म्हणजे "Astrophysics, Astronomy, Genetics,मनोविज्ञान सह आधुनिक विज्ञानात होणाऱ्या संशोधनात "देश काल निमित्त" च्या परिभाषेतील सर्व भारतीय तत्वज्ञानाची महत्वाची भूमिका असेल. त्यासाठी लेखक इंजि.कृष्णा पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच व "ओढ शाश्वत अनुभूतीची" हे ज्ञानयोग,उठा ,जागे व्हा..!,आकाशाशी जडले नाते,एका दिशेचा शोध, Brief History of Time , Theory of Relativity या आवडत्या पुस्तकांच्या पंक्तीत दाखल झाले. #ज्ञानयोग #स्वामी_विवेकानंद #swamivivekanand #अध्यात्म #साधना 2/2









