सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार यावर्षीपासून सातवा वेतन आयोग नवी दिल्ली : केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा आता संपणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना याच वर्षापासून पगारवाढ मिळणार आहे. वेतन आयोगाच्या सिफारशींहून अधिक ही वाढ असेल. मोदी सरकारनं पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांपूर्वी हा प्रश्न निकालात काढला जाण्याची शक्यता आहे. सरकार न्यूनतम पगर १८ हजाराऐवजी २१ हजार करण्यावरही विचार करत असून या निर्णयाचा प्रामुख्याने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांना फायदा होणार आहे. मोदी सरकारने सातवा वेतन आयोग हा शेवटचा असल्याचा निर्णय घेतला होता. ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी आहे. मात्र यानंतर वेतन आयोग नासका तरीही दरवर्षी कर्मचाऱ्याची पगारवाढ होणार आहे.













