गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय! भंडारा : एकूण 32 मतफेऱ्यामध्ये आघाडी घेत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांचा विजय झाला असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांना 2 लाख 8 हजार मते मिळाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने युती केली होती. मधुकर कुकडे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. इतर ठिकाणी मतविभागणीचा फायदा भाजपला होताना दिसत असला तरीही राष्ट्रवादीला या जागेवर मोठ्या प्रमाणावर एकगठ्ठा मते मिळाली. भाजपच्या हेमंत पाटले यांना एकूण 1 लाख 88 हजार मते मिळाली. गोंदियामध्ये मतदानाचीपालघरमधला भाजपचा विजय हा संशयास्पद आकडेवारी राष्ट्रवादी : 2,08,883 भाजप : 1,88,300 भारीप : 7602 इतर : 2234









