साधक पवनासारखा हलका, पाण्यासारखा निराकार अन् आकाशासारखा सर्वव्यापी होतो तरी कसा ?
पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकी पाऊल न लागे ।येणें येणें प्रसंगे । येती बहुता सिद्धि ।। २७० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालला तरी पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक सिद्धि त्यास प्रसंगानुसार प्राप्त होतात. दह्यापासून ताक व लोणी तयार होते. हे लोणी ताकावर तरंगते. ही क्रिया विचारात घेऊन या ओवीकडे पाहावे. भावनांच्या, मोहाच्या, लोभाच्या, भीतीच्या, वा…












