इतिहासाचे सादरीकरण
इतिहासाचे सादरीकरण ज्याला जसा पाहिजे तसा,इतिहास दामटला जातो.ऐतिहासिक दामटादमटीत,इतिहास चेमटला जातो. ज्या पाहिजे त्या रंगात,इतिहास रंगवला जातो.कधी अकलेचे तारे तोडून,इतिहास गुंगवला जातो. अजेंडा पक्का करूनच,इतिहास पेश केला जातो !कोरडा इतिहास ओला करून,इतिहास कॅश केला जातो !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)मोबाईल-9923847269












