https://www.youtube.com/live/9R1VzyAJXKs?feature=share शालेय अभ्यासाबरोबर सामान्य ज्ञान आणि विविध कौशल्य आत्मसात करा पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे मत ; जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्यावतीने ५ व्या क्री़डा महोत्सवाचे पारि तोषिक वितरण ; प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यंदाचे करंडकाचे विजेते पुणे : आपल्या बैद्धिक क्षमतेबरोबर आपली शारीरिक क्षमता देखील चांगली असली पाहिजे. जर तुम्ही तंदुरुस्त असाल तर कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग भरारी घेवू शकता. अभ्यासाबरोबर विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेच पण त्याचबरोबर सामान्यज्ञान देखील चांगले पाहिजे, असे मत भारताचे पहिले पॅराॅलिंपिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या ५ व्या जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवलच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यंदा प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय करंडकाचे मानकरी ठरले. कार्यक्रमाला सिंहगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. राहुल यादव म्हणाले, खेळामुळे सर्वगुणसंपन्न होते, त्याचे आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण होते. मी लहानपणी खेळाकडे फक्त विरंगुळा म्हणून पाहिले. परंतु त्याचा उपयोग मला माझ्या आयुष्यात खूप चांगला झाला. आज मुले मोबाईल गेम खेळत असतात. परंतु मैदानी खेळ खेळताना दिसत नाहीत. खेळामुळे शारीरिक आरोग्याबरोबर आपले मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. इच्छाशक्ती वाढते आणि दृष्टीकोन देखील बदलतो, असेही त्यांनी सांगितले. #JadhavarGroup (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CqBWoDENM1t/?igshid=NGJjMDIxMWI=



















