#Tree plantation, #worldenvironmentday, @sdgsclub, #jgpss #biodiversityconservation जागतीक पर्यावरण दिनानिमित्ताने जयवंतराव घ्यार पाटील सेवाभावी संस्था, साटंबा_आदर्श कॉलनी, हिंगोली यांचे वतीने हिंगोली येथील हिलटॉप कॉलनी येथील विठठल रूख्मीनी मंदीर परीसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी जांभूळ या वन्य फळझाडाचे रोपटयाचे रोपन मान्यवराचे हस्ते करण्यात आले. सदर रोपटयांचे संवर्धन विठ्ठल रूख्मीनी मंदीर समीती करणार आहे. त्यांनी यापुर्वीही बरेच वृक्षाची लागवड केली असून त्यांचे संवर्धन सुध्दा करीत आहेत. या बाबत संस्थेच्या हाकेला साथ देत काही देणगीदार व्यक्ती यांनी संस्थेला देणगी दिली. सदर देणगी मधून वन्य फळझाडांची 1200 रोपांची रोपवाटीका विकसीत करण्यात आली असल्याचे संस्थेचे संस्थापक मा. श्री. चंद्रकांत घ्यार पाटील यांनी सांगीतले. सदर रोपे वृक्षारोपन कार्यक्रमाठी उपलब्ध आहेत. सार्वजनिक व खाजगी ठीकाणी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी कोणी स्वीकारत असले तर संस्थेकडून उपलब्ध रोपांचा पुरवठा करण्यात येईल असे सांगण्यात आले. देणगीदारांनी संस्थेच्या या कामासाठी देणगी देण्याचे आवाहन या प्रसगी संस्थेचे वतीने करण्यात आले. संस्थेची नोदणी 80 जी कलमान्वये आयकर विभागाकडे असून देणगीदारांना आयकरा मधून सूट मिळते असे ही सांगीतले. औषधी गुणधर्म असलेली व पर्यावरणाचे राखण्यास सहाय्यभूत असलेली वन्य फळझाडाची तोड मोठया प्रमाणात झाली आहे. सहज मीळणारी वन्य फळे आता शोधून ही मीळत नाहीत. उदा. बीबा, चारोळी, कवठ, जांभूळ, चिंच, बेल, इ. यासारख्या फळझाडाची रोपवाटीका संस्था विकसीत करीत आहे. ज्यां कोणाकडे वन्य फळझाडाच्या बीया असतील त्यांनी सुध्दा संस्थेशी संपर्क करून या कामी सहकार्य करण्याचे आवहान करण्यात आले. या प्रसंगी हिलटॉप कॉलनी येथील जेष्ठ नागरीक व विठ्ठल रूख्मीनी मंदीर समीतीचे जेष्ठ सदस्य तथा जि.प. हिंगोली चे सेवा निवृत्त कक्ष अधिकारी मा.श्री. गंगाधरराव डोल्हारे, महाराष्ट्र ग्रामिण बँक चे सेवा निवृत्त शाखा व्यवस्थापक मा. श्री. शाम पतंगे, संस्थेचे संस्थापक मा. श्री. चंद्रकांत घ्यार पाटील, संस्थेचे स्वयंसेवक अक्षय पाटोळे, युवक आरूण टेकाळे, ग्रा. प. केसापूर येथील कर्मचारी श्री. केशव शिंदे आदीची उपस्थिती होती. https://www.instagram.com/p/Cebb1PYvPM7/?igshid=NGJjMDIxMWI=















