हा सिनेमा केल्याप्रकरणी श्रेयस तळपदे आजही स्वत: मानतो सुदैवी
2005 मध्ये रिलीज झालेल्या ‘इक्बाल’ सिनेमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. श्रेयस तळपदेने या सिनेमात मुकबधिर मुलाची भूमिका साकारली होती. एका मूकबधिर मुलानं आपलं खेळाडू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष या सिनेमात चितारला होता. या सिनेमात श्रेयस तळपदेसह नसिरुद्दीन शाह, श्वेता प्रसाद, प्रतिक्षा लोणकर, यतिन कार्येकर हे कलाकारही होते. या सिनेमाने 16 वर्षं पुर्ण केली आहेत.















