स्पृहा जोशी 💗 Reposted from @spruhavarad तिची एकही बातमी मिळत नाही अम्हालाच का काहिही कळत नाही तिथे देव दगडी, तरी दूध प्याला, इथे आमुचा नवस का फळत नाही! तुला, सांग उत्साह येतो कुठूनी? शिशीरातही पालवी गळत नाही मनाचे मनाशी कधी लग्न व्हावे? कितीही करा पत्रिका जुळत नाही! दगड कोरडेठाक संवेदना ह्या.. कशानेच हा जीव का जळत नाही! तुझ्या भूलथापा, खुलासे हवेसे कळे सर्व काही, तरी वळत नाही! नको वाटते ही गती धावण्याची अशा शर्यती, मी मुळी पळत नाही. किती रक्त प्याले, तरी रिक्त प्याले.. घडी घातला चेहरा मळत नाही! - स्पृहा ✍️ . #SpruhaJoshi #Poetry #SpruhaVarad #MarathiActress #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/CTCFHYUoisD/?utm_medium=tumblr
















