'द ऑफेंडर'चे पोस्टर लॉन्च मुंबई / मेघा जेठे : 'द ऑफेंडर-खलनायकाची गोष्ट' या चित्रपटाचे पोस्टर आज सोशल मीडिया वर लॉन्च करण्यात आले. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हे पोस्टर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, हि एक थ्रिलर, लव्ह ट्रँगल मर्डर मिस्ट्री आहे. जेव्हा नवरा बायकोच्या नात्यात विसंगती येते तेव्हा नेमके त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते आणि मग त्यातून काहीतरी गुन्हा घडतो. आपण कायदा हातात घेतो आणि हा कायदा हातात घेणे म्हणजेच ऑफेंडर. या चित्रपटाला हॉलिवूड बॉलेअर्ड आणि कॅनेडियन डाईव्हर्सिटी फिल्म फेस्टिव्हल ऑफिशियल सिलेक्शन तसेच ७ वे दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल २०१७ ऑफिशियल सिलेक्शन व स्पेशल ज्युरी मेन्शन असे अवॉर्ड मिळाले आहेत. या चित्रपटात डॉ. अमित कांबळे (श्रीराम), सुशील महाजन (अर्जुन) आणि दीप्ती इनामदार (दीप्ती) यांच्या प्रमुख भूमिका असून अनिकेत सोनवणे, दिनेश पाटील, सुरज दहिरे, शिवाजी कापसे आणि सोमनाथ जगताप हे सहकलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुशील महाजन यांनी केले असून सोमनाथ जगताप यांचे सह दिग्दर्शन आहे. श्री. एस. एम. महाजन आणि श्री. आर. ए. कांबळे हे चित्रपटाचे निर्माते आहेत.











