"माझी आई"- कविता
“माझी आई”- कविता
आई या शब्दाचा अर्थ आज उमगला मजला. “आ” म्हणजे आशीर्वाद “ई” म्हणजे ईश्वर ईश्वराने दिलेला आशीर्वाद म्हणजे आई.
आई माझी दैवत, आई माझे जग, हृदयावर धावे माझ्या आईचे नाव.
स्वतः उपाशी राहून पोट नेहमी माझे भरलेस, भर उन्हात घाम गाळुनी, मला मायेच्या छायेत ठेवलेस.
मला हसताना पाहून हसू तूला येते, मी रडताना मात्र अश्रू तुझे वाहते.
कुशीत बाळगूनी मला संकटापासून वाचवलेस तू, मला मोठे करण्यासाठी साऱ्या जगाशी लढलीस…
View On WordPress











