मनाचे भटकणे थांबते कसे ?
परी मनाचेनि स्थैर्ये धरिला । भक्तीचिया भावना भरला ।योगबळें आवरला । सज्ज होउनी ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – परंतु मनाच्या स्थिरतेनें धरलेला व भक्तीच्या भावनें भरलेला व योगबलानें आवरलेला असा तया होऊन. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जो साधक मनाच्या स्थैर्याने धारण केलेला आहे, ज्याचे अंतःकरण भक्तीच्या भावनेने पूर्णपणे ओथंबलेले आहे आणि ज्याने योगबळाच्या साहाय्याने मनाला आवरले आहे, असा तो…

















