प्रेमातून केलेले काम सदा सफलच
परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम ।म्हणऊनि तयाचे काम । सदा सफल ।। ११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – परंतु असें जें प्रेम, तें अर्जुनाच्याच ठिकाणीं अमर्याद आहे, म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा विलक्षण प्रकाश केवळ एका योद्ध्याचे कौतुक नाही; तर भक्ती, प्रेम, निष्ठा आणि आत्मसमर्पण या चतु:सूत्री जीवनमार्गाचे…






