स्थैर्याला ओळखणे म्हणजेच अध्यात्म
तें माझें परम । साचोकारें निजधाम ।हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ।। २०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – असें जें स्वरूप, तें माझें स्वतःचें खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे, ही अंतरंगातील गुह्य गोष्ट तुला दाखवीत आहे. ज्ञानदेव येथे केवळ तत्त्वज्ञान सांगत नाहीत; ते अर्जुनाच्या अंतःकरणात एक दिवा लावतात. त्या दिव्याचा प्रकाश बाहेरच्या जगाला उजळण्यासाठी नाही, तर आतल्या अंधाराला ओळखण्यासाठी आहे.…







