Top 3 Foods To Avoid In Rainy Season | Saam TV
पावसाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नये हे जाणून घ्या.
मुंबई : पावसाळा म्हटलं की, अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. सर्दी, ताप व खोकल्यासारख्या अनेक आजारांचा आपल्याला सामना करावा लागतो.
पावसाळ्यात आपल्याला अनेक थंड-गरम पदार्थांची चव चाखायला मिळते. यादरम्यान आपल्यातला खाद्यप्रेमी जागा होतो त्यामुळे आपल्याला नवनवीन पदार्थ सतत खाण्याची इच्छा होत असते. परंतु, या ऋतूमध्ये आपल्याला अनेक आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे अतिसार, अपचन किंवा पोटदुखीची समस्या सुरु होते. पावसाळ्यात आपण रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ सेवन टाळायला हवे हे जाणून घेऊया. (Monsoon Diet)
१. अनेकदा आपण संध्याकाळी किंवा रात्री बाहेर पडून पावसाळ्याच्या आनंद घेत असतो. रस्त्यालगत असणाऱ्या स्टॉल्सवरुन आपण भजी, समोसे आणि वडापाव खायला आपल्याला आवडते. या तेलकट पदार्थांचे (Food) सेवन केल्यामुळे आपण आजारी पडू शकतो. तसेच हे पदार्थ पचण्यासाठी देखील जड असतात त्यासाठी ते घरी बनवून खायला हवे.
२. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले मानले जात असले तरी पावसाळा आला की ते टाळणेच योग्य आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी ते अजिबात खाऊ नये. या हंगामात हिरव्या भाज्यांच्या पानांमध्ये आपल्याला हानी पोहोचवणारे कीटक असू शकतात. जर हे रात्री बनवले तर ते आपल्याला त्यात किटक दिसणार नाही त्यामुळे आजारी पडू शकतो.
३. दही हे प्रोबायोटिक असल्यामुळे प्रत्येकाने त्याचा आहारात समावेश करायला हवा. परंतु, ते खाण्याची योग्य वेळ कोणते हे आपण जाणून घ्यायला हवे. दह्यात कूलिंग इफेक्ट असतो आणि त्यामुळे पावसाळ्यात रात्रीच्या आहारापासून दूर ठेवणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. विशेषत: ज्या लोकांना आधीच सर्दीचा त्रास आहे त्यांनी दही अजिबात खाऊ नये. (Foods To Avoid In Rainy Season)
४. पावसाळ्यात (Monsoon) समुद्रातील खाद्यपदार्थ पूर्णपणे टाळावेत, वेळ कोणतीही असो. आपण सीफूड प्रेमी असाल, तरीही आपल्याला जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तविक, पावसाळ्यात पाणी दूषित होते अशावेळी आपण जे मासे किंवा कोळंबी खातो त्यामुळे आपण आजारी पडू शकतो.