देवधर आणि वनदेवीचा करार | Marathi Horror Story
देवधर कोणाचा नव्हता.ना आई, ना वडील, ना नातेवाईक.तो एका पावसाळी रात्री गावाबाहेरच्या जुन्या मंदिराच्या पायऱ्यांवर सापडला होता.कुणीतरी ठेवून गेलेलं मूल.गावाने त्याला आसरा दिला नाही…फक्त जगू दिलं.लहानपणापासून तो काम करत होता.कोणाच्या शेतात पाणी भरायचं, कोणाच्या घरात लाकूड फोडायचं, कधी जनावरं हाकायची.काम झालं की थोडं अन्न मिळायचं.नाहीतर उपास.रात्री तो मंदिरात झोपायचा.थंड दगडावर, अंगावर फाटकी चादर.कधी कधी तो देवासमोर बसून शांतपणे रडत राहायचा.
Read more













