मोहन जोशी यांचा ‘स्वत:च्याच पायावर धोंडा’, फेसबूक व्हिडीओमुळे ट्रोल ‘गुलाल किती उरला रे? पोतभर. काय सांगतो? हो काय करणार आता मिरवणुकीत पहिल्यासारखी मजाच नाही राहिली राव?’ अशा आशयाचा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचा संवाद असणारा व्हिडिओ आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी सोशल मीडियावर टाकला खरा पण हा व्हिडिओ त्यांच्या चांगलाच अंगलट आला.














