ब्रिटिश सरकारला दिलेला एक तमाचा अशी ही घटना चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, रोशनसिंग, अशफाक उल्ला-खान इत्यादींनी काकोरी कटाची योजना आखली. ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे थांबवून क्रांतिकारकांनी सरकारी खजिना लुटला. शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी त्यांना पैसा आवश्यक होता. सरकारने धरपकड केली. सर्वांना फाशीची शिक्षा दिली. चंद्रशेखर आझाद सरकारच्या हाती लागले नाहीत. हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही प्रभावी संघटना १९२८ मध्ये दिल्ली येथे एका गुप्त परिषदेत स्थापन करण्यात आली. इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी बॉम्ब तयार करणे, शस्त्रे वापरण्याचे शिक्षण देणे, हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी उभारणे असा कार्यक्रम आखण्यात आला. #kakoriKand #ChandshekharAzad #Hindustan #RamPrasadBismil #RepublicanArmy #FreedomFighters #InquilabZindabad #VandeMataram #Indian #Bharatiya #EastIndiaCompany






