नाशिक पासून २९ किलोमीटर अंतरावर असणारे त्र्यंबकेश्वर हे आद्य तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध आहे. याच त्र्यंबकेश्वर गावाच्या पाठीमागे ब्रम्हगिरीचा भला मोठा पर्वत उभा आहे. “दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपुरी” असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी ब्रम्हगिरीचे महात्म्य सांगितले. दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाची मानली जाणारी गोदावरी नदी याच ब्रम्हगिरी पर्वतावर उगम पावते. पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य म्हणजे हा ब्रम्हगिरीचा पर्वत. अनेक संत, महर्षी, ऋषी यांनी या पर्वतावर तपस्चर्या केली त्यामुळे या ब्रम्हगिरी पर्वताच्या अनेक पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक या पौराणिक महात्म्यामुळे ब्रम्हगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात व हा डोंगर चढून जातात. ______________________________________ PC @sahyadri.wanderer ✨ . . Tag Us @nashik_guide Use Hashtag #nashikguide ______________________________________ . TAG us to get Featured ⛰️😍 : Do Follow @nashik_guide ______________________________________ . #bramhagiri #trambakeshwar #nashiktourism #nashik_ig #nashikjournal #nashik_trekkers #nashikblogger #nashikcity_org😍😘😘 #nashikdhol #nashikkar👑 l #mynashikmydream #nashikgram #nashiktraveller #nashikphotography #nashik_exploring #nashikcity #nashikinstagrammers #gadvede_trekkers #maharashtra_forts #maharashtradesha #maharashtratourism #maharashtra_ig #maharashtra_clickers #maharashtra_click (at Nashik - the Best Climate City) https://www.instagram.com/p/CP2Cp9-hs6K/?utm_medium=tumblr