PC - @valmik_kolhe - नाशिक जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यांना गडकिल्ल्यांचे कोंदण लाभलेले आहे. सेलबारी, डोलबारी, दुधेश्वर उपरांग, त्र्यंबकरांग, पेठ उपरांग, सातमाळ रांग, नाशिकची नैर्ऋत्य व वायव्य उपरांग, चणकापूर डोंगररांग, गाळणा टेकड्या गडकिल्ल्यांनी गजबजलेल्या आहेत. नुसत्याच गजबजलेल्याही नाहीत तर या प्रत्येक गडकोटांचे वेगळेपण त्यांच्या ठायी दडलेलं आहे. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास मात्र विखुरलेल्या अवस्थेत आहे. तो किल्ला कोणी, कधी बांधला अन् कशासाठी बांधला. त्याभोवतीच्या ऐतिहासिक घडामोडी अन् शौर्य नोंदविण्याची गरज आहे. गाळणा रांगेतील येवल्याजवळील अनकाई-टनकाई किल्ल्याचीही ती अवस्था पहायला मिळते. अनकाई डोंगरावरील किल्ल्याचा उपयोग यादव काळापूर्वीपासून टेहळणी नाका म्हणून केला जात असे. हा किल्ला यादवकालीन असून, देवगिरीचे यादव सम्राट सिंघणाच्या (इ.स.१२००-१२४७) कारर्कीदीत तो परमारांच्या ताब्यात होता. यादवांनी परमारांचा किल्लेदार श्रीधर याला फितूर करून हा किल्ला जिंकला, असे पुरातत्त्वज्ञ डॉ. ओ. पी. वर्मा यांनी नोंदविले आहे. अनकाईचे लिखित पुरावे फारसे मिळत नाहीत. मात्र मुघल बादशहा शहाजहान याचा सुभेदार खानखनान याने अलका-पलका किल्ला जिंकून घेतला यावेळी अनकाई-टनकाई हा किल्लाही इ. स. १६३५ मध्ये जिंकल्याचा उल्लेख मिळतो. ● 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 & 𝗧𝗮𝗴 - @nashik_guide #ankaifort #ankaitankai #manmad #maharashtraforts #maharashtraforts #sahyadrimountains #sahyadri_kille_official #nashikguide #forts_treasure #fortsofmaharashtra (at Ankai Fort) https://www.instagram.com/p/CP2e-l4BT5Q/?utm_medium=tumblr