Bharadwaj Madam from Bharatpur Ashram visited Majha Ghar Foundation.

seen from T1
seen from Germany
seen from China
seen from United States
seen from Australia
seen from Finland
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from France
seen from Canada
seen from United States
seen from United States

seen from Canada
seen from France
seen from China

seen from United States
seen from T1

seen from Australia
seen from Canada
Bharadwaj Madam from Bharatpur Ashram visited Majha Ghar Foundation.
At once soothing and satisfying to the creative urge, making greeting cards is a favourite activity at our workshop and these cards are priced at Rs. 30 each.
The mission of Navkshitij is to create a home for mentally challenged friends, where their ageing parents can see them relocated, assured that their child will live a life which is happy, dignified, warm and full of excitement and joy, and also be an accepted part of society; and in this way motivate and empower other NGOs and parents to start many such centres, replicating the Navkshitij model.
The mentally challenged friends at Navkshitij make scented candles of different sizes and shapes that could entice anyone. From ice-cream cone shaped candles to the petal shaped ones, there is one for every age and occasion.
We make a variety of candles at Navkshitij – Tinny, Minny, Medium, Big, Tea light candles and Mountain Rock candles.
A set of 6 tea light candles costs Rs 60. There is a decorated variation of the tea light candle, which comes at the same price. Tinny (85 gm) and Minny (100 gm) are priced at Rs 40 and Rs 60 respectively. Medium candles (170 gm) cost Rs. 80 each and the Big ones (190 gm) cost Rs. 120 each. The big-sized Mountain Rock candle, weighing around 500 gm, has a price tag of Rs. 300.
The mission of Navkshitij is to create a home for mentally challenged friends, where their ageing parents can see them relocated, assured that their child will live a life which is happy, dignified, warm and full of excitement and joy, and also be an accepted part of society; and in this way motivate and empower other NGOs and parents to start many such centres, replicating the Navkshitij model.
This is yet another activity that mirrors our Green policy. We use organic waste from our kitchen and workshop to make organic compost that can be used in gardens at home or in offices.
After using the petals from the used flowers from temples for making agarbattis and natural colour, the remaining portion of the flowers is used to make 100% Pure Organic Compost, which is priced at Rs. 100 a kilo. This Compost will boost the growth of plants and vegetables in your garden.
भविष्यातील योजना
https://navkshitij.org/26-bhavisyatila-yojanaभविष्यातील योजनांचा विचार करताना या वर्षामध्ये असवलीमध्ये पक्क्या घरांचे बांधकाम सुरु करणे, हा विचार प्रामुख्याने पुढे येतो. यासाठी अनेक पातळ्यांवर मदत लागणार आहे. ती मदत मिळविण्यासाठी हितचिंतकांना भेटणे हे महत्त्वाचे काम या वर्षात करायचे आहे. जसे बांधकाम होत राहील त्याप्रमाणे मुलांना प्रवेश देणे, त्या प्रमाणात मुलांच्या मदतीकरता सहकारी वाढवणे व हे करताना सगळ्यात महत्त्वाचे, मारुंजीसारखीच सिस्टिम इथे बसेल याची काळजी घेणे. मला खात्री आहे असवली घराची चांगली सिस्टिम लवकर बसेल कारण आम्ही कुसगावचे घर जवळजवळ दोन वर्षे यशस्वीपणे चालविले होते.
लहान मुलांच्या पालकांशी संवाद साधायचा आहे. विशेष मुलाला वाढवताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा, त्यांना जास्तीत जास्त प्रेम देऊन सुरक्षित भावना देऊन स्वावलंबी कसे बनवावे, फाजील लाड न करता त्यांना शिस्त कशी लावावी व सर्वात महत्त्वाचे त्यांच्या भविष्याचे नियोजन कसे करता येईल? व ते का करणे गरजेचे आहे? या व याशिवाय अनेक विषयांवर पालकांशी चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करायची इच्छा आहे. अन्य पालकांना, कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना नवनव्या कल्पना राबवून बघण्यास प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्याबरोबर संवाद वाढवायचा आहे. यामुळे अनेक पालकांचे आयुष्य सुसह्य होईल व विशेष मुलांनाही चांगले आयुष्य मिळू शकेल.
एक्सचेंज प्रोग्रॅमसाठी जास्त संस्थांमार्फत पोहोचायचे आहे. या प्रोग्रॅमचे महत्त्व त्यांना पटवून द्यायचे आहे. १४ वर्षांवरील विशेष मुलांसाठी असलेली ‘हॉलिडे होम’ ही संकल्पना जास्त पालकांपर्यंत पोहोचवायची आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणली तर मुलांच्या भविष्यातील पुनर्वसनाला कसा फायदा होतो, हे पालकांना समजावून द्यायचे आहे. पालकांना नवक्षितिजसारखी निवासी कार्यशाळा काढण्यासाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शन करायचे आहे. मी अदितीच्या बाबतीत हे केलेले असल्यामुळे माझा या संकल्पनेवर विश्वास आहे.
काळजीवाहकांसाठी सुरु केलेल्या कोर्ससाठी जास्त संस्थांनी कर्मचारी पाठवावेत, यासाठी प्रयत्न करायचा आहे. मुलांच्या निवासी कार्यशाळा चालवताना अनेक स्तरावर अडचणींचा सामना संस्थाचालकांना करावा लागतो. नियमित भेटल्यामुळे संस्थाचालकांमधील सुसंवाद वाढेल व एकमेकांना अडचणीच्यावेळी मदत करायची भावना वाढीला लागेल. यासाठी निवासी कार्यशाळेच्या संस्थाचालकांनी नियमित भेटावे, याकरता प्रयत्न करून याचे महत्त्व त्यांना पटवून द्यायचे आहे.
इंग्लिशमध्ये असलेली कार्यप्रणाली मार्गदर्शिकेचे (ऑपरेशन मॅन्युअल) मराठी भाषांतर छापून, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. कार्यप्रणाली मार्गदर्शिकेचा वापर कसा करावा? याबाबतीत इतर संस्थांतील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही कार्यशाळा घ्यायच्या आहेत.
शाळेचा विस्तार करायचा आहे. शाळा व स्वमग्न मुलांसाठीची कार्यशाळा, याची घडी अजून नीट बसवायची आहे. निवासी कार्यशाळेच्या सिस्टिम अजून व्यवस्थित बसवायच्या आहेत. नवक्षितिजचे फंड रेजिंगचे काम सातत्याने व कार्यक्षमतेने होण्यासाठी, या क्षेत्रातील तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे.
या सगळ्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेकांची मदत लागणार आहे. आतापर्यंत जसे तुमचे संवेदनशील सहकार्य मिळाले तसेच पुढेही मिळेल, याची मला खात्री आहे. https://navkshitij.org/26-bhavisyatila-yojana
‘नवक्षितिजची स्थापना व वाटचाल’ हा माझ्यासाठी एक संपन्न अनुभव आहे. या अनुभवांनी माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. यामुळे मला जीवनाचा अर्थ उलगडायला लागला. शाळा, कॉलेजमध्ये शिकायला मिळाले त्यापेक्षा कैकपटीने जास्त स्वतःबद्दल, जीवनाबद्दल, जीवनमूल्यांबद्दल शिकायला मिळाले.
या वाटचालीत माझ्या आयुष्यात अनेक विशेष मित्रमैत्रिणी आले. त्यांची सुखदुःखे समजून घेऊन त्यांचे आयुष्य समृद्ध करण्याकरता मी हातभार लावू शकले. या बदल्यात माझ्या ओंजळीत मावणार नाही एवढे प्रेम त्यांनी मला दिले. अदिती बरोबर इतर मुलांचे हसरे, आनंदी चेहरे नवक्षितिजमध्ये पाहिले की, माझा ऊर समाधानाने भरुन येतो.
मुले शाळेत आल्यामुळे आपसुकच त्यांच्या आई-वडिलांशी संवाद घडेल. त्यांना विशेष मुलांचा पूर्णपणे स्वीकार करणे, त्याला स्वावलंबी बनवणे कसे आवश्यक आहे यासाठी जीवनशिक्षणाचे महत्त्व पटवता येईल. विशेष मुलांचे अतिलाड न करता त्याला लहान वयापासूनच शिस्त लावणे, त्याला स्वावलंबी बनवण्यासाठी कसे महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व त्यांना पटवून देता येईल, असे लक्षात आले. विशेष मुलांचे पालनपोषण करताना आई-वडिलांनी आनंदी राहाणे किती आवश्यक आहे व हे कसे करता येईल, याकरता मार्गदर्शन, अशा अनेक विषयांवर त्यांना समुपदेशन करता येईल, असे मला वाटले.
प्रौढ विशेष मुलांबरोबर काम करताना असे लक्षात यायला लागले की, यांतील बहुसंख्य मुलांना लहानपणापासून शारीरिक स्वच्छता, आहाराच्या चांगल्या सवयी, खेळायची सवय, लैंगिक शिक्षण, स्वतःला व्यक्त करता येणे, हवं नको ते कळणे, समाजामध्ये वावरायची सवय याचे योग्य मार्गदर्शन मिळालेले नाही. काही पालकांनी मुलांचे पालनपोषण अतिलाड व अतिसुरक्षितेत केले. या सगळ्याचा परिणाम म्हणून मुलांचा आत्मविश्वास वाढला नाही, हीनतेची भावना वाढीस लागली व वर्तणूक समस्यांचे प्रमाण वाढले. मुलांची वये वाढली, पण क्षमता वाढल्या नाहीत. या विषयावर विचार करताना असे लक्षात आले की, विशेष मुलांबरोबर त्यांच्या लहान वयापासून काम झाले, तर या परिस्थितीत बदल होईल. या विचारातूनच लहान मुलांसाठी लवकर उपचार पद्धत व शाळा सुरू करावीशी वाटली.