आपल्याला काही दुखापत झाली कि "आई गं !" असे उद्गार निघतात पण तेच रस्ता ओलांडताना जवळून गेली कि "बाप रे" असे उद्गार निघतात. कारण संकटात सापडलो कि सोडवणारा "बाप" असतो मराठी आणि मराठीच का हिंदु संस्कृतीमध्ये "आई" या शब्दाला आणि नात्याला वास्त्यल्याची मूर्ती मानले जाते "बाप" त्या मानाने नेहमीच दुर्लक्षित राहिला आईच्या महानतेचे गोडवे गाताना "बाप" कुठेतरी हरवला. पण आई इतकाच "बाप" पण मुलांवर प्रेम करतो आई घास भरवते पण बाप तो घास घरापर्यंत आणण्याच्या प्रयत्नात सगळे आयुष्य खर्ची घालतो. म्हणूनच आपल्याला कृष्णावर माया करणारी यशोदा आठवत असेल तर कृष्णाला भर पावसात जीवाची पर्वा न करता टोपली मध्ये नदीतून गोकुळात आणणारा बाप वसुदेव पण आठवला पाहिजे. This post is dedicated to all FATHERS on the occasion of FATHER DAY......









