Chicken Manchow Soup Recipe in Marathi and English see below or Show More. चिकन मनचाव सूप रेसिपी मराठी व इंग्लिश भाषेत खाली दिली आहे. साहित्य : २ चमचे तेल २ ...
Chicken Manchow Soup Recipe in Marathi and English
Chicken Manchow Soup Recipe in English
Ingredients :
2 Spoon Oil 2 Spoon of Finely Chopped Garlic 2 Spoon of Finely Chopped Ginger ¼ Cup of Finely Chopped Capsicums ¼ Cup of Finely Chopped Cabbage ½ Spoon Black Pepper Powder 1 Spoon Green Chilli Sauce 1 Spoon of Red Chilli Sauce 1 Spooon of Soy Sauce 2 Cup Chicken Stock ( 150 gram Chicken Pieces + 3 Cup Water) 1 Spoon of Vinegar 3 Spoon Finely Chopped Spring Onions 1 Egg 2 Spoon Corn Flour Salt as per Taste
Procedure :
In a Pan put 2 Spoons of Oil and when hit 2 Spoon of Finely Chopped Garlic, 2 Spoon of Finely Chopped Ginger, ¼ Cup of Finely Chopped Capsicums, ¼ Cup of Finely Chopped Cabbage and Saute. Now add Salt as per Taste, ½ Spoon Black Pepper Powder, 1 Spoon Green Chilli Sauce, 1 Spoon of Red Chilli Sauce, 1 Spoon of Soy Sauce and Saute. Now Add 2 Cup Chicken Stock and Boiled.
* (Chicken Stock Procedure : 150 gram Chicken Pieces + 3 Cup Water And Boiled 7-8 Minutes and just take the stock aside.)
Take the Boneless Chicken Pieces used to make the Chicken Stock and add it Soup. Add 1 Spoon of Vinegar, 3 Spoon of Finely Chopped Spring Onions, Boil it for 2 Minutes Add an Egg and Stir well. Then put the Cornflour Paste.
* (Cornflour Paste Procedure : In a Bowl Take 2 Spoon of Cornflour and 5 Spoon of Water for making the Paste)
Stir Well and Boil it. Your Chicken Manchow Soup is Ready !
Tip: You can Serve the Chicken Manchow Soup with Green Chilli Sauce, Red Chilli Sauce and Soy Sauce.
चिकन मनचाव सूप मराठी रेसिपी
साहित्य :
२ चमचे तेल २ चमचे बारीक चिरलेला लसूण २ चमचे बारीक चिरलेले आले १/४ कप बारीक चिरलेली सिमला मिरची १/४ कप बारीक चिरलेला कोबी १/२ चमचा काळीमिरी पावडर १ चमचा ग्रीन चिली सॉस १ चमचा रेड चिली सॉस १ चमचा सोया सॉस २ कप चिकन स्टॉक (१५० ग्रॅम चिकनचे तुकडे +३ कप पाणी ) १ चमचा व्हिनेगर ३ चमचे बारीक चिरलेली कांद्याची पात १ अंडे २ चमचे कॉर्नफ्लोअर चवीनुसार मीठ,
कृती :
कढई मध्ये २ चमचे तेल टाका व गरम झाल्यावर २ चमचे बारीक चिरलेला लसूण, २ चमचे बारीक चिरलेले आले, १/४ कप बारीक चिरलेली सिमला मिरची, १/४ कप बारीक चिरलेला कोबी टाकून परतून घ्या. चवीनुसार मीठ, १/२ चमचा काळीमिरी पावडर, १ चमचा ग्रीन चिली सॉस, १ चमचा रेड चिली सॉस, १ चमचा सोया सॉस टाकून परतून घ्या. २ कप चिकन स्टॉक टाकून उकळी घ्या.
* ( चिकन स्टॉकची कृती : १५० ग्रॅम चिकनचे तुकडे + ३ कप पाणी टाकून ७ ते ८ मिनिटे शिजवून / उकळून घ्या व नंतर गाळून फक्त पाणी (स्टॉक) घ्या.)
आता वरील स्टॉक तयार करण्यासाठी घेतलेल्या स्टॉक मधील चिकनचे बोनलेस तुकडे टाका. नंतर १ चमचा व्हिनेगर, ३ चमचे बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून २ मिनिटे उकळी आल्यानंतर १ अंडे फोडून टाका व लगेच चांगले ढवळून घ्या व कॉर्नफ्लोअर पेस्ट टाका.
* ( कॉर्नफ्लोअर पेस्ट कृती : एका भांड्यात २ चमचे कॉर्नफ्लोअर + ५ चमचे पाणी टाकून एकत्र करून पेस्ट तयार करा. )
चांगले एकत्र करून एक उकळी घ्या. चिकन मनचाव सूप तयार झाले. टीप : चिकन मनचाव सूप सर्व्ह करताना आवडीनुसार ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस टाका.









