Divya - Stambh Date : 6th Jan 2019 क.डों.म.पा कार्यालयावर अनधिकृत बांधकाम विरुद्ध शिवसेन नगरसेवकांचा ठिय्या आंदोलन . कल्याण डोंबिवली मध्ये प्रशासन तर्फे अनधिकृत बांधकाम विरुद्ध किती ढसाळपणे कारवाई करण्यात येत आहे याचे स्पष्ट उदाहरण शनिवारी दिसून आले . तक्रार करून व पाठपुरावा करूनही अनधिकृत बांधकाम वर निष्कासनाची कारवाई करत नसल्याचे आरोप लावत क.डों.म.पा चे शिवसेना पक्षाचे नगर सेवक गोरख जाधव , पूर्व नगरसेवक दशरथ तरे व अन्य काही कार्यकर्त्यांनी अ प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करत कामकाज ठप्प पाडले . तेव्हा पुढील कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले . क.डों.म.पा येथे शिवसेना हे सत्ताधारी पक्ष असून जर त्यांच्याच नगरसेवकांच्या तक्रारींवर महानगर पालिके तर्फे दुर्लक्ष करण्यात येत असेल तर सामान्य नागरिकांची किती सुनावणी होत असेल याची कल्पना करणे खूप अवघड नाही . अनधिकृत बांधकाम पहिल्या टप्प्यात न थांबवता नंतर त्यांच्यावर कारवाई करणे हे योग्य नाही . याला शेवटी ग्राहक बळी पडतो हे कोणीही लक्षात घेण्यास तयार नाही . न्यायोचित तर हेच आहे कि जर महानगर पालिका क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई न होता एकवेळा बांधकाम पूर्ण झाले तर यामध्ये जाणून बुजून किंवा अज्ञान मुले संबंधित अधिकाऱ्याची चूक आहे व एकवेळा जर सदर बांधकामाचा ताबा ग्राहकाला दिला तर त्याच्या नंतर त्याच्यावर तोडक कारवाई करताच येता कामा नये . कारण अनधिकृत बांधकाम व्यावसायिक व शासकीय अधिकारी यांच्या कर्माचे फळ सामान्य माणसाने का भोगावे ? #kalyankar #kalyankars #dombivalikar #ias #shivsena #shivsena🚩 #bjpenn #inc #ncp #governmentcorruption (at Kalyan) https://www.instagram.com/p/BsSmS2rhlWX/?utm_source=ig_tumblr_share&igshid=96qib648h8yo













