स्वातंत्र्यदिना निमित्त डायमंड सामाजिक संस्थेकडुन महापुरुषांना अभिवादन.... www.Chhayavrutta.in मनमाड : येथील डायमंड सामाजिक संस्था आणि डायमंड ग्रुप कडुन 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी , क्रांतीवीर वसंतराव नाईक , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डायमंड सामाजिक संस्थेद्वारे नेहेमी अनेक उपक्रम राबवुन सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रम साजरे केले जात असतात , सध्या सुरू असणाऱ्या कोरोना परिस्थिती मुळे आणि शासनाच्या आदेशांचे व नियमांचे पालन करून यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यदिना निमित्ताने कुठल्याही सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन न करता आपल्या भारत देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या या महान महापुरुषांना अभिवादन करून यंदाचा वर्षीचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष श्री रत्नदीप पगारे ,कार्याध्यक्ष श्री केतन जाधव , सचिव श्री दीपक केदारे, खजिनदार श्री फिरोज पठाण, सह-खजिनदार श्री अविनाश चांगटे, उपाध्यक्ष श्री नरेश उगले ,श्री पी. इ .श्री मधे साहेब , उपाध्यक्ष श्री प्रवीण शार्दूल ,श्री निकम साहेब , श्री मंगेश जगताप आदी सदस्य उपस्थित होते. https://www.instagram.com/p/CS119EuNEdA/?utm_medium=tumblr