काकडे परिवाराकडून गौरी पुजन संपन्न.... www.Chhayavrutta.in मनमाड :गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं महत्व आहे . गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी वाजत गाजत या गौरींना घरात आणले जाते .असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. येथील काकडे परिवाराकडुन त्यांच्या निवासस्थानी सहपरिवार गौरी पुजन संपन्न झाले. यावेळी महालक्ष्मीच्या मुखवट्यांची सुंदर अशी सजावट करून छान अशी आरस सजवण्यात आली. गौरी गणपतीला नेवैद्य दाखवुन सुवसनिणींना हळदी-कुंकु देऊन प्रसाद वाटप करण्यात आले.याप्रसंगी काकडे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. #gauriganpati #morya #ganpatibappa #chhayavrutta #manmad https://www.instagram.com/p/CTwuaMDNZG5/?utm_medium=tumblr











