ज्ञान हेच खरे जागरण अन् अज्ञान हीच खरी झोप
जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।मग ज्ञानोदयीं चेइला । म्हणोनिया ।। ४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – ज्या वेळेला तो भ्रांतिरूप अंथरूणावर झोंपला होता, त्यावेळी स्वप्नाच्या सुखानें घेरला होता, मग ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला म्हणून तो आपल्याला कर्ता समजत नाही. ही ओवी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील कर्मसंन्यासयोग या भागाचे निरूपण करताना…












