लेखक : साने गुरुजी प्रकाशन : पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कादंबरी ' श्यामची आई ' मराठी साहित्यातील मैलाचा दगड म्हणून ओळखली जाणारी ' श्यमाची आई ' ही कादंबरी साने गुरुजींच्या अश्रूंमधून साकारली गेली आहे, असे मत प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक प्रभाकर ठेगंडी यांनी व्यक्त केलं आहे.... आई आणि मुलाच्या प्रेमळ,निर्मळ नात्याच हे पुस्तक.....लहानपणीच प्रेमळ आणि कठोरपणाने वागून त्यांच्यावर केलेल्या संस्काराची ही एक छोटीशी गोष्ट....या पुस्तकातील प्रत्येक पाठातून नक्कीच शिकण्यासारखं,बोध घेण्यासारखं आहे......आणि तो बोध घ्यावा याची शिकवण ही अगदी सुंदर शब्दात मांडली आहे..... साने गुरुजींनी म्हंटल्याप्रमाणे हे पुस्तक आईच्या प्रेमळ थोर शिकवणीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र आहे.....हे पुस्तक पवित्र आहे आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेलं आहे.... आईवर असणाऱ्या प्रेमाचं,मायेचं,भक्तीच आणि कृतज्ञता अश्या आपर भावनेनं नटलेल पुस्तक म्हणजे "श्यामची आई ". या पुस्तकाबद्दल जेवढं बोलू किंवा लिहू तेवढं कमीच आहे....हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे आणि हृदय नेहमीच भरून येत.....हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे..... साने गुरुजींनी ही कादंबरी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहलेली आहे...तुरुंगात असताना त्यांच्या मनात नेहमी जन्मदाता,भारतमाता आणि जन्मदात्री माता या तीन मातांचा विचार असायचा....त्यांचे मन आणि हृदय हे आईच्या आठवणीने भरून यायचे त्यातूनच ही कादंबरी उदयास आली.... 📚📖 मराठी,इंग्लिश,हिंदी सर्व साहित्य आणि कवितेसाठी आत्ताच फॉलो करा....📖📚 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 #book #books #marathibooks #mobiletobooks #marathibookreviews #marathibana #instabook #booklover #marathisahity #marathiwriter #kadmabari #bookreader #bookwriter #marathimati #marathibookstagram #read #reading #booklover #bookaddict #bookstagram #Three Thunder (at Pune City) https://www.instagram.com/p/COHnmsIp1X6/?igshid=vgtg88evyml